श्री ग्रंथराज दासबोध अध्ययन

श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड संचालित

अध्ययन उपक्रम

ग्रंथा नाम दासबोध ।

गुरुशिष्यांचा संवाद । येथ बोलिला विशद । भक्तिमार्ग ॥

देणगी

 

 

banner-feature

समर्थ कृपेची वचने

 

जंव उत्तम गुण न कळे । तों या जनास काये कळे ।
उत्तम गुण देखतां निवाले । जगदांतर ।। १२-२-१८ ।।

माणसांमध्ये असणारे उत्तम गुण जो पर्यंत लोकांमध्ये प्रगट होत नाहीत तोपर्यंत लोकांना त्या माणसाच्या योग्यतेची कल्पना येत नाही. जोपर्यंत गुणांची पारख होत नाही तोपर्यंत त्या गुणांची कदर केली जात नाही. पण एकदा का गुण प्रगट झाले की जनताजनार्दन त्याची नक्की कदर करतात.

 

अवगुण सोडिता जाती | उत्तम गुण अभ्यासिता येती |
कुविद्या सांडून सिकती | शहाणे विद्या || १४-६-५ ||

अवगुण सोडायचे म्हंटले तर ते जाऊ शकतात. उत्तम गुण प्रयत्नपूर्वक अंगी बाणता येतात. शहाणी माणसे कुविद्या सोडून देतात आणि उत्तम विद्या शिकतात.

श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड

. . .साधनेसाठी येऊन राहिलेले दिनकरबुवा, अय्याबुवा, दत्ताबुवा, अण्णाबुवा असे अनेक रामदासी एकत्र येऊन १९३९ साली नानासाहेब देवांच्या प्रेरणेने सज्जनगडावर "समर्थ संघाची शाखानिर्माण झाली. या रामदासींना माध्यान्हीच्या जेवणाची सोय नव्हती. हे रामदासी एक-दोन दिवसांनी गडाखालील खेडेगावांमधून भिक्षा आणून स्वयंपाक करून समर्थांना नैवेद्य दाखवित असत.

इ.स. १९४७-४८ च्या दरम्यान उद्योगपती समर्थभक्त बाबुराव वैद्य, सातारा हे गडावर आले व समर्थपूजेतील जीर्ण उपकरणे पाहून येथील जीर्णोद्धार करण्याचा त्यांनी संकल्प केला. येथील दिनकरबुवा वगैरे रामदासींना घेऊन विचार विनिमय केला व समर्थसेवेकरीता एक मंडळ निर्माण करण्याचे ठरविले. मंडळाची घटना तयार करून दिनांक ९ जानेवारी १९५० रोजी प.पू. श्रीधरस्वामींचा आशीर्वाद घेऊन श्री समर्थ संप्रदायाच्या जीर्णोद्धारासाठी "श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड" ही संस्था स्थापन करून कायद्यानुसार रजिस्टर्ड केली.

अधिक वाचा
श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड

सज्जनगड

सह्याद्रीगिरीचा विभण विलसे, मांदार शृंगापरी | नामे सज्जन जो नृपे वसविला, श्री उर्वशीचे तिरी |
साकेताधिपती कपी भगवती, हे देव ज्याचे शिरी | येथे जागृत रामदास विलसे, जो ह्या जनां उद्धरी ||

सज्जनगड! हे त्याचे वर्णन आहे. अनंतकवींनी केलेले! स्वरूपसंप्रदायातील भक्तांची ही पंढरीच. आज ३५० वर्षांनंतर रायगड स्मृतीरुपाने अवघ्या महाराष्ट्राला स्फूर्ती देत आहे आणि सज्जनगड विचाररूपाने मराठी माणसाला श्रीसमर्थ रामदासांचा पुरुषार्थ विचार! आदर्श लोकनेत्याची संकल्पना, परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल दृढ श्रद्धा, माणसामधील अपुरेपण..याच अपुरेपणापासून पूर्णत्वाकडे जाण्याचा मार्ग सांगत आजही मोठ्या अभिमानाने उभा आहे. जागता-नांदता आहे.

अधिक वाचा
 

दासबोध अध्ययनाविषयी -

घरा-घरातून श्री समर्थांचे भव्य दिव्य विचार पोचवावे, समाजात समर्थांची विचारधारा रुजवावी, परत एकदा शिवराज्य-रामराज्य यावे, गर्तेकडे चाललेल्या भोगवादी चंगळवादी समाजाला सावरावे, समर्थांच्या वाणीत सांगायचे तर ‘शहाणे करून सोडावे सकळ जन!’ अशी समाजप्रबोधनाची आस मनी धरून कै.स.भ.द्वा. वा. केळकर तथा अप्पा व गीताताई केळकर यांनी "पत्रद्वारा दासबोध अभ्यास" हा उपक्रम सुरू केला.

अधिक वाचा

दासबोध ब्लॉग

दासबोध परिचय

श्री समर्थ रामदास स्वामींनी दासबॊध हा ग्रंथ लिहिला आहे. समर्थ रामदास स्वामी स्वतःच म्हणाले आहेत की, माझी काया आणि वाणी | गेली म्हणाल अंत:करणी |परी मी . . .

अधिक वाचा

प्रपंच पडदा. . .

समर्थ भक्तीमार्गी, संन्यासवेषी साधू असले तरी ते प्रखर राष्ट्रभक्त होते. १७व्या शतकातील महाराष्ट्राची आणि एकंदरच हिंदुस्थानाची झालेली गलित अवस्था त्यांनी स्वत: पाहिली होती.

अधिक वाचा