श्रीमद दासबोध अभ्यास उपक्रम

दासबोधावरील लेख


Log In

केंद्र संचालक आणि व्यवस्थापकांसाठी


नोव्हेंबर लेख
ऑक्टोबर लेख
सप्टेंबर लेख
ऑगस्ट लेख
जून लेख
मे लेख
एप्रिल लेख
मार्च लेख
फेब्रुवरी लेख
जानेवारी लेख
प्रश्नमंजुषा स्पर्धा
प्रश्नमंजुषा स्पर्धा
प्रश्नमंजुषा स्पर्धा नियम प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्तरे प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्तरे

|| श्रीराम समर्थ ||
"क्रियां करून करवावी | बहूतांकरवी ||"

श्री समर्थ रामदास स्वामी हे आत्मसाक्षात्कारी राष्ट्रसंत होउन गेले. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना मन भारावून जाते. त्यांचे पुण्यस्मरण करण्याचा खराखुरा एकच मार्ग -तो म्हणजे व्यक्ती व समाज ह्यांची ऐहिक व पारलौकिक उन्नती ज्यामुळे साधते अशा त्यांच्या दासबोध ग्रंथाचा अभ्यास व प्रसार करणे.

आत्माराम दासबोध | माझे स्वरुप स्वतःसिध्द |
असता न करावा खेद | भक्त जनी ||
नका करु खटपट | पहा माझा ग्रंथ नीट |
तेणें सायुज्याची वाट | गवसेल की ||

असा आदेशही श्री समर्थांनी देहत्यागाच्या वेळी दिला आहे. त्याला अनुसरून पत्रद्वारा दासबोध अभ्यास हा उपक्रम(श्री. दा. अ.) आदरणीय समर्थभक्त श्री. द्वा. वा. केळकर ह्यांनी १९७९ साली सज्जनगड मासिक श्री समर्थ सेवा मंडळ ह्यांच्या माध्यमातून सुरु केला.

अवनतीला गेलेल्या समाजाला उर्जितावस्था आणण्यासाठी त्यांना माणूस नव्याने घडवावयाचा होता. आजच्या काळातसुद्धा समर्थ विचारांचा माणूस घडविणे ही काळाची मागणी आहे. म्हणून दासबोधाच्या अभ्यासाची गरज आहे.

आजच्या काळातील तरुणाला ज्या समस्या आहेत त्यांचीच उत्तरे श्री समर्थ येथे देत आहेत. 'प्रयत्नवाद हा समर्थ विचारांचा आत्माच आहे'. समर्थांच्या तेजस्वी शिकवणीचा प्रसार समाजामध्ये केला जाणे आवश्यक आहे,तसेच तो तळागाळापर्यंत पोहोचणेदेखील.

"क्रियां करून करवावी | बहूतांकरवी ||" हे या श्री.दा.अ. च्या उपक्रमाचे ब्रीदवाक्य आहे. या प्रमाणे आचार-विचाराने शुध्द व्हावयाचे आणि लोकांना तसे बनविण्याचा यत्न करावयाचा, यातच सर्वांचे कल्याण आहे.

आपण दासबोधाचा अभ्यास करावा व इतरांनासुध्दा तशी प्रेरणा द्यावी.

श्रीमद् दासबोध अभ्यास उपक्रमाच्या माहितीसाठी इथे क्लीक करा